राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते
शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश वाटप
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचा स्तुत्य उपक्रम
उदगीर : राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते कृषि उत्पन्न बाजार समिती उदगीरच्या वतीने नैसर्गिक आपत्तीमुळे वीज पडून जनावर दगावलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.
यावेळी उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामराव बिराजदार पंचायत समितीचे सभापती प्रा.शिवाजी मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर,उदगीर काँग्रेस तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, बाळासाहेब मरलापल्ले, पदमाकर उगिले
आदि उपस्थित होते.
राज्य शासनाच्या 1 एप्रिल 2021 च्या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने निघालेल्या शासन निर्णयानुसार हे धनादेश उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात आले.यावेळी राज्यमंत्रीनी उदगीर शहरात कृषि उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन उभा करावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
लातूर जिल्हयात कोरोना लसीकरण मोहीमेची सुरुवात झाली असून ग्रामीण भागात लसीकरणाबाबत जनजागृती करण्याबाबतही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी अवाहन केले.
0 Comments