उदगीर परिसरात रुग्णांसाठी औषधाची
कमतरता भासणार नाही - राज्यमंत्री संजय बनसोडे
राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी उदगीर येथे प्रस्तावित असलेल्या लिक्वीड ऑक्सिजन स्टोरेज टॅक्कची पाहणी करुन लवकरात लवकर याचे काम पूर्ण करावे अशा संबंधिताना सुचना दिल्या.
उदगीर : जिल्हयात तसेच उदगीर परिसरात कोरोना बाधीत रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढतच आहे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडिसिवीर इंजेक्शन व अन्य वैद्यकीय औषधाची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आयोजित कोव्हिड-19 सद्य:स्थिती आढावा व उपाय योजना बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेटी,तहसिलदार रामेश्वर गोरे,डॉ.हरीदास, पंचायत समितीचे सभापती प्रा.शिवाजी मुळे, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, बस्वराज पाटील नागराळकर उपिस्थत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री श्री.बनसोडे म्हणाले की, जिल्हयात तसेच उदगीर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे या रुग्णावर उपचार करण्यासाठी रेमडिसीवीर इंजेक्शनासह अन्य वैद्यकीय औषधास लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही असल्याचे प्रतिपादन करुन उदगीर शहरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी असे पोलिस यंत्रणेस निर्देशित केले. तसेच उदगीर नगर परिषदेने कोरोना बाधित रुग्णाच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सुचना दिल्या.
यावेळी राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी उदगीर येथे प्रस्तावित असलेल्या लिक्वीड ऑक्सिजन स्टोरेज टॅक्कची पाहणी करुन लवकरात लवकर याचे काम पूर्ण करावे अशा संबंधिताना सुचना दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे नेते बसवराज पाटील नागराळकर, सभापती शिवाजी मुळे, तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, उदगीर शहर पोलिस उपअधिक्षक डानियाल बेन उपस्थित होते.
0 Comments