GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषदे अध्यक्षांनी कोव्हीड हॉस्पिटल मध्ये जाऊन कोरोणा रुग्णांशी थेट साधला संवाद

कोरोनाच्या दुसऱ्या  लाटेचे आव्हान  लातूर जिल्हा परिषदेने स्वीकारले - जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे

 जिल्हा परिषदे अध्यक्षांनी कोव्हीड  हॉस्पिटल मध्ये जाऊन कोरोणा रुग्णांशी थेट  साधला संवाद


 लातूर : जिल्ह्यात आणि देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मृत्यूचे थैमान घातले असून सर्व शासकीय योजनेच्या बारा वाजले आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे आरोप-प्रत्यारोप होत असताना सामान्य जनतेमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झालेले  असताना जनता भयभीत झाली असून दवाखान्यामध्ये कोरोना  च्या पेशंटला बेड  मिळत नाहीत, बेड  मिळाले तर ऑक्सिजन मिळत नाही आणि व्हेंटिलेटर मिळत नाही. अशा अवस्थेत लातूर  जिल्हा परिषद अत्यंत सक्षमपणे काम करत असून आम्ही या कोरोनाच्या  महामारीच्या काळामध्ये जनतेच्या आरोग्याची हाल-अपेष्टा पाहत बसायचे नाही म्हणून जिल्ह्याला कोविड  डेडिकेटेड हॉस्पिटल चालू केले पाहिजे म्हणून मांजरा साखर कारखान्याच्या बाजूला समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहाच्या एका सुसज्ज इमारती मध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे  हॉस्पिटल मागच्या आठ दिवसात चालू केले असून 50 बेड च्या सुसज्ज हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी चालू करण्यात आलेले आहे.

कोरोना  डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांसोबत थेट संवाद साधत असताना जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या रुग्णांना धीर दिला आम्ही तुमच्या सोबत आहोत, आरोग्याच्या दृष्टीने सर्व सोयी सुविधा तुम्हाला पुरवण्याचे काम लातूर जिल्हा परिषदेमार्फत केले जाईल असे यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी रुग्णांना सांगितले.





 लातूर जिल्हा परिषदेचे तरुण तडफदार  आणि कार्यक्षम अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी  काल या डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये स्वतः जाऊन कोरोना  वार्डमध्ये रुग्णांची पाहणी केली.
 कोरोणा रुग्णांशी  केलेला संवाद हृदयस्पर्शी होता तर ते रुग्णही कुणीतरी आपल्याला अशा वाईट परिस्थितीमध्येही वाचवणारा कोणतरी आहे या आशेने येथील  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे  यांच्याकडे पाहत होते.
 असे त्यांच्या चेहर्‍यावरील हावभाव सांगत होते.
 हॉस्पिटल चालू करणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद लातूर जिल्हा परिषद असावी कोणतेही आव्हान स्वीकारण्यासाठी प्रखर  इच्छाशक्तीची गरज असते नवीन उमेद आणि स्वतःच्या आरोग्य पेक्षा ग्रामीण गरीब जनतेची काळजी करणारा एक तरुण नेता आणि जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे तितकेच तरुण आणि उमेद असणारे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिनव गोयल,  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी आणि आपल्या व्यवसायाला समर्पित जिल्हा आरोग्य अधिकारी श्री गंगाधर परगे  आणि आरोग्य विभागाचे सर्व मेडिकल ऑफिसर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्या जोरावर हे हॉस्पिटल चालू करण्यात आले असून काल प्रत्यक्ष भेटीच्या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की 118 रुग्ण दाखल झाले असून काही कोरोणा मुक्त होऊन घरी परतले आहेत. अशा आनंदाची बातमी उपस्थित  जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे,   उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके,  भाजपनेते चेअरमन दगडू  साळुंके,  माजी कृषी सभापती बापूराव राठोड,  भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रा.  पंडित सूर्यवंशी, भाजपा जिल्हा सरचिटणीस  प्रमोद मुदाले  यांच्यासमोर दिली.


*चौकट*

 *जिल्हा परिषदेचे सर्व वैद्यकीय अधिकारी,  नोडल अधिकारी,  आरोग्य अधिकारी,  पॅरामेडिकल स्टाफ नर्स, वार्ड बॉय, हे आपल्या जीवावर उदार होऊन समर्पण भावनेने या रुग्णांची सेवा करत आहेत त्यांनाही काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले*

Post a Comment

0 Comments