GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

चंदरअण्णा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद : राज्यमंत्री संजय बनसोडे

चंदरअण्णा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद : राज्यमंत्री संजय बनसोडे

    उदगीर : कोरोना महामारीच्या काळात आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या 500 कुटुंबांना यावर्षीही चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या हस्ते अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार महर्षी चंदरअण्णा वैजापूरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून  बस्वराज पाटील नागराळकर ,शिवाजीराव मुळे सभापती पं. स.उदगीर,कल्याणजी पाटील ,लाईफ केअरच्या सर्वेसर्वा अर्चनाताई पाटील चाकुरकर ,प्रितीताई भोसले,सहयोग बॅकेचे मॅनेजर सुनित देशपांडे साहेब,रुद्रालीताई पाटील,आदितीताई, पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना बनसोडे चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या कार्याचे  कौतुक व अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ,सूत्रसंचलन शिवशंकर पाटील तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले
सदरील कार्यक्रमास उद्योजक विमलताई गर्जे,रामेश्वर बिरादार, पत्रकार अशोक कांबळे, केदार पाटील, हरिश्चंद्र वट्टमवार,रमेश खंडोमलके, राजकुमार बिरादार बामणीकर, सचिन वाघमारे, कल्याण बिरादार , ज्ञानोबा मुंढे, राजेंद्र स्वामी, विशाल हाळीकर,जय सोनवणे,विजय सुवर्णकार,चेतन परसेने आदी मित्रपरिवार व गरजू लाभार्थी उपस्थित असून कार्यक्रम शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टन्स पाळून घेण्यात आले.

Post a Comment

0 Comments