शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे व खत उपलब्ध करून द्या : पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर : शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे व खत उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने पूर्ण क्षमतेने काम करावे तसेच जिल्हा प्रशासनानेही याबाबत कृषी विभागाला सहकार्य करावे असे आदेश महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री संजय बनसोडे यांनी काल खरीप हंगाम संदर्भात आयोजित बैठकीच्या अनुषंगाने दिले. राज्यमंत्री बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली उदगीर , जळकोट आणि देवणी या तीन तालुक्यांची खरिप हंगामपूर्व नियोजन संदर्भात आढावा बैठक झाली . यावेळी, उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, तहसिलदार रामेश्वर गोरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्ताञ्य गावसाने,कृषि विकास अधिकारी एस.आर. चोले.पंचायत समिती सभापती शिवाजीराव मुळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, उदगीरचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निदुरे, उदगीर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, शिवसेनेचे नेते श्री. चंद्रकांत टोंगेटोल, इ. पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये खरिप हंगामधील प्रमुख पिकांचे बियाणे रासायनिक खते यांच्या उपलब्धतेबाबत चर्चा झाली . कृषि विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या शेतीशाळा , पीक प्रात्यक्षिके , रेशिम शेती , विकेल ते पिकेल अभियान याबाबत सखोल चर्चा झाली . शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे व खत मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याबाबत ना.बनसोडे यांनी आदेशित केले. तसेच तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यासाठीही सुचना केली. घरगुती सोयाबीन बियाने बाबत शेतकऱ्यांना आवाहन केले की घरच्या सोयाबीनची उगवण क्षमता तपा सुन घ्यावी व त्याची पेरणी करावी.
यावेळी बैठकीचे सादरीकरण एस.डी. तिर्थकर उपविभागीय कृषि अधिकारी उदगीर यांनी केले. यावेळी तालुका कृषि अधिकारी संजय नाब्दे, आकाश पवार, तसेच महाबीजचे अधिकारी व कृषि निविष्ठा आसोसियशनचे पदाधिकारी उपस्थित होते .
0 Comments