GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

कोरोना काळात प्रमुख भुमिकेत काम करणाऱ्या त्या योध्दांची काळजी घेणे गरजेचे सह्याद्री प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांचे मत

कोरोना काळात प्रमुख भुमिकेत काम करणाऱ्या त्या योध्दांची काळजी घेणे गरजेचे 

सह्याद्री प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांचे मत

उदगीर : सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असून हा दुसरा टप्पा अतिशय खडतर असल्याचे शासन स्तरावर सांगण्यात येत आहे. काळाची पावले ओळखून आपण सर्वांनी आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना काळामध्ये प्रत्यक्षात काम करणारे शहरातील शासकीय कार्यालय व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांना उदगीर येथील नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी तहसील कार्यालयात जावुन सॅनीटायझर व मास्क वाटप केले.
यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे, नायब तहसीलदार संतोष गुट्टे, मंडळाधिकारी गणेश हिवरे, तलाठी अमोल रामशेट्टी, उद्योजक मयुर वट्टवमवार, न.प. उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक दत्ता पाटील, सावन पस्तापुरे आदी उपस्थित होते.
सदर उपक्रम हा उदगीर चे माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब पाटोदे हे राबवत आहेत. 

Post a Comment

0 Comments