मातृभूमीत जागतिक महिला दिन उत्साहात
" सबला " भित्तीपञकाचे प्रकाशन
उदगीर : जागतिक महिला दिनानिमित्त मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळसचलित मातृभूमी महाविद्यालय , मातृभूमी नर्सिंग स्कूल कस्तूराबाई नर्सिंग स्कूल येथे जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षणार्थींनी संपादन केलेल्या "सबला "भित्ती पत्रकाचे प्रकाशन मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश उस्तुरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डाॅ रवि पाटील यांची उपस्थिती होती. आज महिलांच्या कार्याने समाजकारण , राजकारण ,शिक्षण , कला साहित्य सांस्कतीक किंबहुना मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेञाशी व्यापून टाकले आहे महिला ही अबला नसुन सबला आहे . महान महिलांचे नेतृत्व ,कर्तृत्व हे विचार विद्यार्थ्यांना कळावे व विचाराबरोबरच मुलींना अभिव्यक्त होता यावे व आपले विचार मांडता यावेत यासाठी प्रा. बिभीषण मद्देवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिंयका सुर्यवंशी, यांनी सबला या भित्तीपञकाचे संपादन केले. यावेळी कोथींबिरे सिमा पल्लवी कांबळे, ममता जाधव ,पूनम कांबळे , राजवाड सुकन्या , दिपाली कांबळे ,ललिता श्रंृगारे , रोहिणी काटेकर ,विभावरी कांबळे मोतीवार रेखा यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. रेखा रणक्षेत्रे
,प्रा. मिना केंद्रे , प्रा. फुलनदेवी किवंडे आदिंनी प्रयत्न केले.वकार्यक्रमाचे संचलन प्रियंका सुर्यवंशी केले तर आभार पल्लवी कांबळे यांनी मानले.
0 Comments