GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

कौळखेड, घोणसी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या पाठपुराव्याला यश

कौळखेड, घोणसी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या पाठपुराव्याला यश


  उदगीर : तालुक्यातील कौळखेड  जळकोट तालुक्यातील घोणसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास शासनाने  विशेष बाब मंजुरी दिली आहे.  या आरोग्य केंद्रामुळे तालुक्यातील 38 गावांना आरोग्य विशेष सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दै.देशोन्नतीला दिली.  
    उदगीर व जळकोट तालुक्यातील वाढत्या  लोकसंख्येमुळे उपलब्ध असलेल्या आरोग्य केंद्रावर ताण पडत होता, नागरिकांना उपचारासाठी दुर जावे लागत होते; यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती.  येथील नागरिकांची अनेक दिवसांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी होती.  या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे मौजे कौळखेड  या ग्रामीण भागातील जवळपास 21 गावांना तर जळकोट येथील मौजे घोणसी भागातील 17 गावांना या  आरोग्य केंद्राचा फायदा होणार आहे.
      या आरोग्य केंद्रामुळे ग्रामीण भागात आरोग्याच्या सोई सुविधा उपलब्ध होणार आहेत. या भागातील लोकसंख्येचा विचार करता जवळपास 70 हजार लोकांना या दोन्ही आरोग्य केंद्राचा फायदा होणार आहे. शासनाने विशेष बाब म्हणून या आरोग्य केंद्रास मान्यता दिली आहे. या आरोग्य केंद्रासाठी शासनाने  वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यक परिचारिका असे एकुण प्रत्येकी 15 पदे मंजूर केले आहेत.
      मौजे कौळखेड (उदगीर)  मौजे घोणसी येथे विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य विषयक सोय करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे ,वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातुरचे पालकमंत्री अमितजी देशमुख यांचे राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments