GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

खा.सुधाकर श्रृंगारे यांची शिफारस ; दक्षिण मध्य रेल्वे बोर्ड सदस्यपदी पप्पू गायकवाड

खा.सुधाकर श्रृंगारे यांची शिफारस ;
दक्षिण मध्य रेल्वे बोर्ड सदस्यपदी पप्पू गायकवाड 

उदगीर : लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या शिफारसीने भाजपचे सक्रिय कार्यकर्ते तथा उदगीर भाजप शहर सरचिटणीस पप्पू गायकवाड यांची दक्षिण मध्य रेल्वे बोर्ड समितीवर सदस्य म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. 
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालय अंतर्गत दक्षिण मध्य रेल्वे बोर्ड समितीवर लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या सक्रीय कार्यकर्त्यांची निवड झाली पाहिजे यासाठी लोकप्रिय खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी केंद्र सरकारच्या दक्षिण मध्य रेल्वे बोर्ड समितीवर त्यांनी शिफारस केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सक्रीय, सक्षम कार्यकर्त्यांची दक्षिण मध्य रेल्वे बोर्ड समितीवर सदस्यपदी नियुक्ती केली आहे. 
यामुळे लातूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम करणे, केंद्र सरकारच्या रेल्वेविषयक प्रत्येक ध्येयधोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिले पाहिजे अशी भूमिका खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड, माजी आ. गोविंद केंद्रे,अनुसूचीत जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. सुधाकर भालेराव, जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपा प्रदेश सचिव नागनाथ निडवदे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी त्यांचा सत्कार केला.
या निवडीबद्दल जि.प. चे माजी उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य रामचंद्र  तिरूके, भाजपा ज्येष्ठ नेते भगवानराव पाटील तळेगावकर, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, न. प. पाणी पुरवठा सभापती मनोज पुदाले, नगरसेवक रामचंद्र मुक्कावार, रामेश्वर पवार, शहाजी पाटील, अँड. दत्ता पाटील, रूपेंद्र चव्हाण, नामदेव आपटे, डॉ. चंद्रकांत कोठारे, सचिन हुडे, नागेश अष्टुरे आदी नगर सेवकांसह भाजपाचे अनुसूचीत जाती प्रदेश उपाध्यक्ष प्रा.पंडित सूर्यवंशी , जिल्हाध्यक्ष अनु.जाती बालाजी गवारे , जि.प. सदस्य संजय दोरवे , माजी जि.प. सदस्य दयानंद कांबळे , उपाध्यक्ष पंडीत सुकणीकर , भाजपा तालुका अध्यक्ष बस्वराज रोडगे, शहराध्यक्ष उदयसिंह ठाकुर , मोतीलाल डोईजोडे,  प्रदेश महिला मोर्चा सदस्य उत्तरा कलबुर्गे, सरोजा वारकरे, महिला शहराध्यक्ष मधुमती कनशेट्टे आदींनी अभिनंदन केले आहे .

Post a Comment

0 Comments