ग्रामविकासाची प्रक्रिया जनआकांक्षा पूर्ण करणारी - जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे
उदगीर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणारी विकासकामे ही ग्रामविकासासाठी उपयुक्त असून या माध्यमातून होणारा ग्रामविकास हा जनआकांक्षा पूर्ण करणारा असल्याचे प्रतिपादन जि .प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले.कै.वसंतराव नाईक चौक ते निडेबन या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सुधाकर भालेराव होतेतर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेश सचिव प्रा.नागनाथ निडवदे, न.प.उपाध्यक्ष सुधीर भोसले,जि.प.सभापती सौ.ज्योती राठोड,विरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे,चंद्रकांत पाटील कौळखेडकर,भाजपाचे शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, पं.स.सदस्य विजय पाटील, प्रा.पंडीत सुर्यवंशी, डॉ . कोठारे, रतिकांत अंबेसंगे, नगरसेवक अॕड.दत्ता पाटील, गणेश गायकवाड आदी उपस्थित होते. जि.प.चे माजी सभापती बापूसाहेब राठोड यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. निडेबन गटात झालेल्या विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. प्रारंभी विधीवत पूजन करून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हा परिषदेने आपल्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध विकासकामे राबविली आहेत. विकासाच्या प्रक्रियेत शासन प्रशासनाबरोबरच सा-याच घटकांनी सहभागी होणे गरजेचे आहे,केवळ रस्ते होणे गरजेचे नाही तर विकासप्रक्रियेबाबत माणसाची मने सुद्धा मोठी झाली पाहिजेत असे केंद्रे पुढे बोलताना म्हणाले. अंगणवाड्यांच्या मुल्यमापनाची व स्मार्ट अंगणवाडीची अंमलबजावणी करणारी लातूर जिल्हा परीषद पहिली जि.प. आहे, महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योतीताई राठोड यांचा यात मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. राठोड दाम्पत्याला असलेली विकासाची तळमळ कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी विकासासाठी लागणाऱ्या राबविलेल्या योजनांचा आढावा घेत सर्वांनी मिळून आपण ही प्रक्रिया पुढे नेऊ असे सांगितले . प्रा.नागनाथ निडवदे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
0 Comments