GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लातूर जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

लातूर जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

   सर्व विभागातील कामांना गती द्यावी असे राहुल  केंद्रे यांनी दिले निर्देश 


लातूर : काल दि. 9 फेब्रुवारी रोजी लातूर जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या 14  विभागाच्या  कामाचा आढावा घेण्यात आला.यावेळी सर्व कामांना गती द्या असे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सर्व विभागप्रमुखाना दिले. लातूर जिल्हा परिषद मध्ये सर्व विभागात वेगवेगळे ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे राज्यभरात लातूर पॅटर्न निर्माण झाला आहे, लातूर जिल्हा परिषदेचे काम करण्याची गती आणखीन वाढली पाहिजे असे मतही
 यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल  केंद्रे यांनी व्यक्त केले.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या  उपाध्यक्षा  भारतबाई सोळंके,  कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे , समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, बांधकाम सभापती संगीताताई घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण  गिरी,आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

राहुल केंद्रे यांचा ऐतिहासिक निर्णय...

आपल्या आई-वडीलांना न  सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून  30% रक्कम कपात करण्याचा ऐतिहासिक निर्णय लातूर  जिल्हा परिषदेने घेतला असून यामध्ये 12  तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 7 प्रकरण निकालात काढले असून त्यांच्या कपात सुरु करण्यात आल्या आहेत. तर  5  प्रकरणी  चौकशी चालू असून लवकरच निर्णय होईल असे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments