राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून बसवराज पाटील मुरुमकर यांचे सांत्वन
लातूर : राज्याचे संसदीय कार्य पाणीपुरवठा व स्वच्छता भूकंप पुनर्वसन सार्वजनिक बांधकाम रोजगार हमी योजना व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मुरूम येथे जाऊन मातोश्री गंगादेवी माधवराव पाटील यांच्या निधनाबद्दल माजी राज्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांची सांत्वन पर भेट घेतली. व मातोश्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, बाबुराव पाटील, शरण बसवराज पाटील ,दिलीप भालेराव, सुरेश दाजी बिराजदार , सिध्देश्वर पाटील, विजय निटुरे, रामदास चव्हाण इत्यादी उपस्थित होते.
0 Comments