GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मतदान जागृतीसाठी सामुहिक प्रयत्नांची गरज : तहसिलदार रामेश्वर गोरे

मतदान जागृतीसाठी सामुहिक प्रयत्नांची गरज: तहसिलदार रामेश्वर गोरे


उदगीर : "लोकशाही प्रक्रियेत मतदान अधिक होणे हे सजगतेचे लक्षण आहे,यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे"
असे प्रतिपादन उदगीरचे तहसिलदार रामेश्वर गोरे यांनी केले.राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उदगीर तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी 
नायब तहसिलदार संतोष गुट्टे, धनंजय गुडसूरकर , सौ.अनिता येलमटे व्यासपिठावर उपस्थित होते.लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी मतदारांची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन तहसिलदार गोरे पुढे बोलताना म्हणाले.
यावेळी बोलताना साहित्यिक व वक्ते धनंजय गुडसूरकर यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना सांगून मतदान प्रक्रियेतील कार्य हे देशसेवेचा भाग असल्याचे सांगितले .साहित्यिक सौ.अनिता येलमटे यांनी लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व सांगून भारतीय लोकशाही मजबुत असल्याचे सांगितले .नायब तहासिलदार (निवडणूक ) संतोष गुट्टे यांनी यावेळी राष्ट्रीय मतदानदिनाचे महत्त्व सांगितले .


    यावेळी दर्शन बिरादार.श्रीमती एस.एस.शेख,राजकुमार कपाळे,जी.एम.पचंडे,ओंकार मनदुमले,सय्यद रजियोद्दीन हाश्मी,डी.जी.बोभे,वर्षा राठोड,दीपक महालिंगे,भास्कर जाधव,संजय डुकरे,वसंत मुंढे,संतोष आचारे,संगीता मळभागे ,एस.सि.खेडे,व्ही.पी.गुरमे,डी.बी.नकुरे या मतदानस्तरीय केंद्रअधिका-यांचा व पर्यवेक्षक शिवशंकर पाटील यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.दगडू केंद्रे यांनी सुत्रसंचालन तर नायब तहसिलदार संतोष गुट्टे यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments