हैदराबाद येथील अंबरपेठ शिवसेनाच्या विभाग प्रमुख पदी उदगीरच्या करण सूर्यवंशी यांची निवड
उदगीर : येथील रहिवासी असलेले व हैदराबाद येथे स्थायिक करण सूर्यवंशी यांची हैदराबाद येथील अंबरपेठ विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून एका मराठी भाषिक नागरिकांना निवड केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे अंबरपेठ विधानसभा मतदारसंघाच्या विभागीय अध्यक्षपदी उदगीरच्या नागरिकांची निवड शिवसेनेने केली त्यामुळे उदगीरात करण सूर्यवंशी यांचे अभिनंदन होत आहे. सूर्यवंशी मूळ उदगीरचे परंतु उद्योगामुळे ते हैदराबाद ते स्थायिक झाले हिंदुत्वाचा बाणा अंगी बाळगत हातात भगवा ध्वज घेवुन याठिकाणी त्यांनी विविध आंदोलन केले याची दखल घेऊन शिवसेनेचे हैदराबाद विभागाचे अध्यक्ष ठाकूर विकास सिंग, सचिव बी. केशव गुप्ता यांनी त्यांची अंबरपेठ विधानसभा मतदारसंघाच्या विभागीय अध्यक्षपदी निवड केली आहे.
0 Comments