GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

"पेडल टू गो"सायकलिंग ग्रुपतर्फे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा

"पेडल टू गो"सायकलिंग ग्रुपतर्फे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा 

उदगीर -   येथील "पेडल टू गो" या संघटनेतर्फे "राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस" २५ किलोमीटर सायकलिंग करून साजरा करण्यात आला. 
            सायकलिंग मुळे प्रदूषण वर मात करणे कसे सहज शक्य आहे याबद्दलचे मार्गदर्शन धनंजय गुडसुरकर यांनी यावेळी विशद केले. तर आज नवीन सायकलिंगसाठी आलेले डॉ.मनोहर सूर्यवंशी आणि संदीप देशमुख यांचे स्वागत डॉ संजय कुलकर्णी व सुनील सावळे यांनी केले. वायू प्रदुषणच नव्हे तर आरोग्य प्रदूषण सुद्धा सायकल मुळे कसे कमी करता येते या बद्दल विस्तृत मार्गदर्शन यावेळी डॉ.संजय कुलकर्णी व डॉ मनोहर सूर्यवंशी यांनी केले व जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलकडे वळावे व आपले व या वसुंधरेचे आरोग्य सांभाळावे असे आवाहन ही यावेळी केले.
             या प्रसंगी डॉ संजय कुलकर्णी,धनंजय गुडसुरकर,ओमकार गांजुरे,अमोल घुमाडे,सुनील सावळे,विकास देशमाने,डॉ मनोहर सूर्यवंशी,डॉ.गजानन टिपराळे,राहुल वट्टामवार,संदीप मद्दे,करण रेड्डी नागराळकर,युवराज कांडगिरे,सुनील भुयारे,कानमंदे अनिकेत,हरी दांडीमे व "पेडल टू गो" चे इतर सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments