GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीरला सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणारे रंगकर्मी प्रतिष्ठान

उदगीरला सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणारे रंगकर्मी प्रतिष्ठान
 उदगीर - महाराष्ट्र, तेलंगणा ,कर्नाटक  या राज्याच्या सीमेवर वसलेले उदयगिरी बाबा यांच्या  पदस्पर्शाने पावन झालेले ऐतिहासिक उदगीर शहर ,उदगीर शहरास सांस्कृतिक चळवळीला वैभव प्राप्त करून देण्याचे कार्य रंगकर्मी साहित्य, कला ,क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील सहा वर्षापासून होत आहे . रंगकर्मीच्या माध्यमातून देश स्तरावरील लघुपट महोत्सवाचे आयोजन, पथनाट्यातून प्रबोधन, आरोग्य शिबिरे ,अभिनय वक्तृत्व कार्यशाळा ,शैक्षणिक ,सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचा गौरव अशा विविध उपक्रमांतून रंगकर्मी प्रतिष्ठान हे कार्य करीत असते .
         मागील पाच वर्षापासून देश स्तरावरील लघुपट महोत्सवाचे आयोजन उदगीर येथे  रंगकर्मी करत आहे. चांगल्या कलाकृती व सोबतच कलावंताला एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य रंगकर्मी प्रतिष्ठान करत असते .अभिनेते श्रीराम गोजमगुंडे, फॉरेनची पाटलीन चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप  घोणशीकर, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई , तात्या लहाने चित्रपटाचे दिग्दर्शक  निर्माते वानखेडे, बबन चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक व गायक ओंकारस्वरूप बागडे ,अभिनेत्री शिवकांत सुतार ,अभिनेत्री शीतल पाटील, आला बाबूराव गीतफेम लक्ष्मण कांबळे ,राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेता आदींच्या प्रमुख उपस्थितीत  लघुपट महोत्सवाचे आयोजन केले गेले.   
            मागील पाच वर्षात  २२५ लघुचित्रपट महोत्सवात सहभागी झाले होते.  हा चित्रपट महोत्सव उदगीरच्या रसिक रसिकांसाठी एक मांदियाळीच असते . परंतु  महाराष्ट्राच्या  शेवटच्या टोकावर असलेल्या  उदगीर शहरात अतिशय प्रतिकूल परिस्थिती रंगकर्मी प्रतिष्ठान  लघुपट महोत्सव आयोजन करत असते त्यामुळे उदगीरच्या सांस्कृतिक वैभवात  भर घालण्याचे महत्त्वाचे कार्य प्रतिष्ठान करत आहे.

पथनाट्यातून प्रबोधन !

 प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यसनमुक्ती जनजागृती पथनाट्य ,पर्यावरण संवर्धन, बेटी बचाव बेटी पढाव, मतदार जनजागृती, आधी विषयावर पथनाट्य सादर करत राष्ट्रीय कार्यात सहभाग घेत असतात.

आरोग्य शिबिर व नेत्रचिकित्सा शिबिर !

 रंगकर्मीच्या माध्यमातून उदगीर व जळकोट परिसरात सांस्कृतिक कार्याबरोबरच आरोग्य शिबिर व नेञ चिकित्सा शिबीराचे आयोजन करत सामाजिकता जोपासली जाते .

 गौरव व सन्मान !
 महाराष्ट्रभरातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती व संस्था यांचे सन्मानाचे आयोजन ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असते.

 विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जानिवा निर्माण व्हावे !
 विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण व्हावी यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा ,रंगभरण स्पर्धा निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र मध्ये केली जाते. 
           सभापती सिद्धेश्वर मुन्ना पाटील विजयभैया  निटूरे , चंदन  पाटील नागराळकर, मातृभूमी प्रतिष्ठान चे अध्यक्ष सतीश उस्तुरे ,अमोल कांडगिरी, डॉ. माधव चंबुले, डॉ. दीपक सोमवंशी, प्रा. उदय पाटील, श्री. बाळासाहेब पाटोदे,  यांच्यासह अन्य मान्यवरांचे सहकार्य व मार्गदर्शनाखाली होत असते.  रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड,सचिव ज्योती मद्देवाड,अँड. विष्णू लांडगे, रसूल पठाण, अॅड. महेश मळगे , पत्रकार सिद्धार्थ सूर्यवंशी ,मारुती भोसले ,रामेश्वर पटवारी ,माधव रोडगे अनमोल कवडेकर ,सचिन शिवशेट्टी, बसवेश्वर डावळे ,विष्णू कवठेकर,आकाश कांबळे, आकाश गायकवाड हे पदाधिकारी कार्य करीत असतात.

Post a Comment

0 Comments