मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी दाखवली दिव्यांगा प्रति संवेदनशीलता
लातूर - ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोना आणि निवडणुकीची आचारसंहिता या काळात समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर यांनी अभिनव पद्धतीने जागतिक दिव्यांग दिवस साजरा केला.माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री अभिनव गोयल , जिल्हा परिषद लातूर यांनी सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना स्वतःच्या दालनात बोलावून सत्कार केला व दिव्यांग अति तीव्र स्वरूपाचे आहेत त्यांच्या कार्यालयात जाऊन स्वतः त्यांचा सत्कार केला.
सत्कारात पुष्पगुच्छ सोबत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र अग्निपंख हे सर्व दिव्यांग कर्मचारी यांना भेट देण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान दिव्यांग कर्मचाऱ्यांशी संवाद साधत असताना त्यांच्या अडीअडचणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जाणून घेतल्या व जिल्हा परिषदेची पूर्ण इमारत दिव्यांग फ्रेंडली बनवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले.
प्रत्येक दिव्यांग कर्मचाऱ्याने पाच दिव्यांगांना दत्तक घेऊन त्यांना स्वावलंबी बनवावे. असे आवाहन याप्रसंगी जिल्हा समाजकल्याण अधिकारी, सुनील खमितकर यांनी केले. सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद तसेच दिव्यांगाचे ब्रँड अँबेसिडर बनावे असे आवाहन देखील केले.
0 Comments