GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

जिल्हयात 89 टक्के दिव्यांग पदवीधर मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क !

जिल्हयात 89 टक्के दिव्यांग पदवीधर मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क !

लातूर -     जिल्हयात 1 डिसेंबर 2020 रोजी औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे मतदान झाले असून, लातूर जिल्हयातील दिव्यांग क्षेत्रात पदवीधरांना मतदान करण्यासाठी जनजागृती व दिव्यांग व्यक्तींना सहाय्य केल्यामुळे जिल्हयात 89 टक्के दिव्यांग पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 
        राज्यात सर्वात जास्त दिव्यांग मतदानाची नोंद लातूर जिल्हयात झाली आहे. दिव्यांग आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्या सुचनेप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी दिव्यांग मतदारामध्ये मतदानासाठी जाणीव पूर्वक प्रबोधन केले.त्यांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या र्मादर्शनाखाली सर्व मतदार केंद्रावर रॅम्प, व्हीलचेअर, आदी साहित्याची व्यवस्था करण्यात आली होती.
            जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी या बाबतीमध्ये विशेष परिश्रम केले होते. विभागामध्ये व राज्यामध्ये जास्त मतदान केल्याबद्दल सर्व दिव्यांग मतदारांचे व त्यांना सहाय्य करणाऱ्या दिव्यांग शाळेतील व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments