शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागाला जबाबदारी देणार : माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने गांभार्याने घेण्याच्या आमदार संजय बनसोडे यांच्या सुचना
उदगीर : लातुर जिल्हयातील उदगीर हे लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे शहर आहे.आपले शहर हे तीन राज्याच्या सीमेवर असल्याने येथील बाजारपेठ मोठी असुन येथे नेहमीच वाहनधारकांची व नागरीकांची गर्दी असते. विविध शासकीय कार्यालये व शाळा, महाविद्यालय, मार्केट यार्ड व बाजार पेठेमुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे.
उदगीरची लोकसंख्या दिड लाखाच्या जवळपास असल्याने गेल्या १० वर्षात शहरातील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच पोलीसांची संख्या कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागाला जबाबदारी देणार असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते लातूर पोलीस दल आयोजीत
उदगीर शहर वाहतूक समस्या व उपाययोजना संदर्भातील आयोजीत बैठकीत बोलत होते.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे हे तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आ.गोविंद केंद्रे, माजी आ.मनोहरराव पटवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, उपविभागीय पोलिस अधिकारी
दिलीप भागवत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, कार्यकारी अभियंता सायस दराडे, राष्ट्रीय महामार्गाचे पाटील, शफी शेख, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एल.डी. देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एस. गायकवाड, अविनाश कुदळे, पोलीस उपनिरीक्षक कविता जाधव, बसवराज तपशाळे, प्रा.श्याम डावळे, समीर शेख, अजित पाटील तोंडचिरकर, मौलाना हबीबुर रहमान, भरत चामले, डाॅ.रामप्रसाद लखोटिया, चंद्रकांत टेंगटोल, श्रीमंत सोनाळे, मोतीलाल डोईजोडे, सुधीर भोसले, दत्ता पाटील , सतिश कांबळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, सर्व विभागाचा आढावा व उपाययोजना संबंधित अधिका-यांकडुन ऐकून घेवुन उदगीर शहरात वेगळी वाहतूक शाखा स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करणार असुन शहरातील प्रमुख रस्ते नगर परिषदेने अतिक्रमण मुक्त करावे.
भाजी मार्केट मध्ये उभारण्यात आलेली पोलीस चौकी कायमस्वरूपी करावी.
शहरातील मंजूर असलेले पोलीस कर्मचा-यांची पदे भरावेत. शहरातील अॅटो पार्किंगला जागा उपलब्ध करुन देवून अॅटो थांबा करावा अशा सुचना देवून पोलीस प्रशासन व नगर परिषदेने समन्वय साधून शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. शहराच्या विकासाठी विविध इमारती व रस्ते, सभागृह, आरोग्य केंद्र व पाणीपुरवठा योजनेसह शहरात सी. सी. टी.व्ही व सिग्नलसाठी लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला. उदगीर शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रिंगरोडसह, तिवटग्याळ पाटी ते ललित भवन पर्यंत ४ पदरी रस्ता मंजूर केला. त्यासाठी ७० कोटी रुपये मंजूर केले. १९९७ पासुन मलकापूर भागात उड्डानपुल नव्हता त्यासाठी ३५ कोटी रुपये मंजूर करुन घेतले. समतानगर भागातील नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे म्हणून
मार्केट यार्डात ही उड्डानपुल मंजूर करुन घेतला असुन त्याचे डिझाईनचे काम चालु असल्याचे आ.बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी विविध मान्यवरांनी व नागरिकांनी वाहतूक कोंडीवर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.मल्लेश झुंगास्वामी यांनी केले तर आभार ग्रामीणचे पो.नि. अरविंद पवार यांनी मानले. यावेळी
मराठवाडा जनता विकास परिषदेचे पदाधिकारी व शहरातील नागरीक, वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments