GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

जिल्हयातील दिव्यांगाना केंद्रीयमंत्री थावरचंदजी गहलोत यांच्या हस्ते कृत्रिम साहित्य वाटप

जिल्हयातील दिव्यांगाना केंद्रीयमंत्री थावरचंदजी गहलोत यांच्या हस्ते कृत्रिम साहित्य वाटप
 लातूर- केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंञालय व भारत कृञिम अंग निर्माण( अल्मिको) यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यातील 8 हजार 797 दिव्यांगांना उपयोगी कृत्रिम साहित्याचे वाटप केंद्रीय सामाजिक न्यायमंञी मा.थावरचंद गहलोत यांच्या हस्ते १० डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईनद्वारे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
       या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंञी संजय बनसोडे, खा. सुधाकर श्रृंगारे, माजी मंत्री,आ. संभाजी पाटील निलंगेकर,भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड, जि.प अध्यक्ष राहुल केंद्रे,उपाध्यक्षा भारतबाई साळुंके,जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी मेहनत घेतलेले तत्कालीन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत,सर्व सभापती,दिव्यांग अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.
         एवढ्या मोठ्या प्रमाणात दिव्यांगांना साहित्यांचे वाटप करणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद आणि देशातील दुसरी जिल्हा परिषद आहे. 8 हजार 797 दिव्यांगांना साहित्यांचे वाटप करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेने दायित्व म्हणून 48 लाख रुपये हे केंद्र शासनाकडे जमा केले होते. हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय गहलोतजी दिल्लीहून सहभागी झाले होते.लातूर जिल्हा परिषदेमार्फत हा उपक्रम राबविण्यात आला.

Post a Comment

0 Comments