ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

ना.संजय बनसोडे यांची डेप्युटी कमिशनर धिरजकुमार कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

ना.संजय बनसोडे यांची डेप्युटी कमिशनर धिरजकुमार कांबळे यांच्या निवासस्थानी  सदिच्छा भेट

उदगीर : महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व बांधकाम मंत्री संजय बनसोडे यांनी दि.२० नोव्हेंबर रोजी उदगीरचे रहिवाशी व सध्या औरंगाबाद येथे कार्यरत असलेले सेंन्ट्रल जी.एस.टी अँन्ड कस्टमचे डेप्युटी कमिशनर धिरजकुमार कांबळे यांच्या सिध्दार्थ सोसायटी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी ना.संजय बनसोडे यांचा डेप्युटी कमिशनर धिरजकुमार कांबळे परिवाराच्या वतीने ह्दयपुर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी दिगंबर कांबळे, सहशिक्षक बाळासाहेब कांबळे, विवेकानंद कांबळे, विशाल कांबळे, अमोल कांबळे यांच्यासह कांबळे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी ना.बनसोडे यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सिध्दार्थ सुर्यवंशी, संघशक्ति बलांडे, सतिश पाटील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post