GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मातीशी नाते माझे, नाळ माझी माणसांच्या वेदनेशी...झोपडीच्या बाहेर बसला गोरगरीबांचा वाली ...

मातीशी नाते माझे, नाळ माझी माणसांच्या वेदनेशी...झोपडीच्या बाहेर बसला गोरगरीबांचा वाली ...
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जमिनीवर बसून साधला ग्रामस्थांशी संवाद...


उदगीर : सिध्दार्थ सुर्यवंशी

उदगीर मतदार संघात गेल्या १० वर्षापासुन अनेक गोरगरिबांचे संसार उभे केले तर अनेकांना मायेचा आधार दिला. हजारो कुटुंबाचे आधारवड असलेले उदगीर - जळकोट मतदार संघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण तथा बांधकाम मंत्री संजय बनसोडे हे उदगीर तालुक्यातील मौजे करडखेल येथील दिवंगत घुंगरबाई गौतम कांबळे यांचे अपघाती दु:खद निधन झाल्याने करडखेल येथे कांबळे कुंटूबियाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी दलित वस्तीत जावून ना.बनसोडे यांनी तेथील गोरगरीब जनतेशी  संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेवुन त्यांना धीर दिला. यावेळी झोपडपट्टी भागात खुर्ची नसल्याने ना.संजय बनसोडे यांनी जमिनीवर बसून येथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्याने महाराष्ट्र राज्याचे मंत्री असूनही आजही आपल्या माणसाशी व आपल्या मातीशी प्रमाणिक राहिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करुन त्यांना भरभरुन आशिर्वाद दिले आहेत.
सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून जवळपास ११ महिने लोटले. या जागतिक कोरोना महामारीच्या काळात सतत बैठका व मतदार संघातील कोरोनाने निधन झालेल्या कुटूंबाना सांत्वनपर भेटी देवून त्यांना आधार दिला. अनेक गोरगरीबांना लाॅकडाऊनच्या काळात अन्नधान्यासह आर्थिक मदतही केली. याच काळात त्यांना कोरोनाची लागण झाली पण या जिवघेण्यारोगावरही यशस्वी मात करुन ते पुन्हा जनतेच्या सेवेत रूजू झाल्याने मतदार संघात आनंदाचे वातावरण आहे. कष्टकरी व दिनदुबळ्यांचे कैवारी म्हणून त्यांची मतदार संघात प्रचीती आहे.
उदगीर - जळकोट मतदार संघात कोट्यावधी रुपायाचा निधी मंजूर करुन विकासाची गंगा खेचुन आणुन आपल्या मतदार संघाचा कायापालट करण्याचा त्यांचा मानस असुन आपल्या मतदार संघाचा विकास करुन महाराष्ट्रात एक माॅडेल मतदार संघ तयार करण्यासाठी ना.बनसोडे हे अहोरात्र कष्ट घेत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात असूनही आपण एक सामान्य कार्यकर्ता असुन आपल्या सर्वांच्या आशिर्वादामुळेच मी आमदार व खा.शरदचंद्र पवार यांच्यामुळेच मी मंत्री असल्याचे ते नेहमी आवर्जुन सांगतात.

Post a Comment

0 Comments