केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली उदगीर येथे कार्यकर्त्यांची बैठक
उदगीर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे निवडणुकीच्या अनुषंगाने आत्मनिर्भर मराठवाडा या प्रचार मोहिमेअंतर्गत केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांनी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या उदगीर येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शन केले. मराठवाडा पदवीधर मतदार संघामध्ये यावेळेस परिवर्तन अटळ असून भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांचे उमेदवार शिरीष बोराळकर हे प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या बैठकीला मराठवाडा निवडणूक प्रमुख माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी आ. गोविंद केंद्रे, माजी आ. पाशा पटेल, भाजपा प्रदेश चिटणीस नागनाथ निडवदे,भगवान पाटील, उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब राठोड, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाअध्यक्ष बालाजी गवारे, जिल्हा परिषद सदस्य बस्वराज पाटील कौलखेडकर, शंकर रोडगे, बस्वराज बिरादार, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, श्यामलाताई कारामुंगे, उत्तराताई कलबुर्गे, शेख शन्नो, उदगीर तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे, शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, भाजपा नगरसेवक मनोज पुदाले,नगरसेवक साईनाथ चिमेगावे, पप्पू गायकवाड, गणेश गायकवाड, रुपेंद्र चव्हाण, नागेश अष्टुरे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल निडवदे, राहुल अंबेसंगे, अमोल अनकल्ले, अभय पारसेवर, दिलीप मजगे, पंडित सुकणीकर, संजय पाटील, सुजित जीवने, बबन मुदाळे, आनंद साबणे, अक्षय पाटील, विकास जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments