शाळा नसलेल्या गावातील विद्यार्थी झाला डाॅक्टर..!
शेतकर्याच्या मुलाने प्रतिकुल परीस्थितीत मिळवले यश
उदगीर : प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी व बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळवता येते याची प्रचिती असलेले यश उदगीर तालुक्यातील नावंदी ग्रामपंचायत अंतर्गत केवळ ३० घरे असलेल्या बुलंदनगर येथील प्रतीक ज्ञानोबा नादरगे यांनी नीट या परीक्षेत ६३५ गुण मिळवत पहिल्या यादीत मुंबई येथील नायर हाॅस्पिटल व मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवुन खडतर परिस्थिती ही यशाच्या आड येत नाही हे
प्रतीक नादरगे यांनी दाखवून दिले आहे.
गावात शाळा नाही गावात बस नाही प्राथमिक सेवा सुविधा नसतानाही त्यांनी हे यश प्राप्त केले आहे हे कौतुकास्पदच आहे.
प्रतिकचे प्राथमिक बुलंदनगर येथेच आता बंद आसलेल्या शाळेत झाले, पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण उदगीर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात तर आठवी ते दहावी श्यामलाल हायस्कूलला आणि अकरावी व बारावी लातूर येथील शाहू महाविद्यालयातुन शिक्षण पूर्ण केले.
वडील व्यवसायाने शेतकरी आई स्वाती या गृहिणी कुठलाही शैक्षणिक वारसा नाही वडील दुध विकत कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. गावात जेमतेम तीस घरे, विद्यार्थी संख्याही कमी झाल्याने गावातील चौथी पर्यंतची शाळा बंद करण्यात आली. मात्र परिस्थितीचा कुठलाही बाऊ न करता परिस्थितीशी सामना करत प्रतिक यांनी मोठे यश प्राप्त केले त्याबद्दल प्रतिकचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .
परिस्थिती माणसाच्या यशाच्या आड येत नाही परिस्थितीचा बाऊ करणाऱ्या साठी प्रतीकचे हे यश " प्रतीकच" असल्याचे दिसते. या यशाबद्दल प्रतीक व त्यांच्या आई वडिलांचा सत्कार प्राचार्य संजीव पुल्ले, प्रा. नरेंद्र परगे, राम उगीले, ज्ञानोबा नल्लावाड, शिवचंद्र नादगरगे, मारोती लंजीले, संजीव उगीले, माधव नल्लावाड , शिवचंद्र नादरगे, मारुती मंजिले, अनिल नादरगे, व्यंकट उगिले, नागनाथ नलावडे, सचिन नलावडे यांच्या वतीने करण्यात आला.
प्रतीकला मदतीची गरज
कोरडवाहू शेतीवर उदरनिर्वाह करत आर्थिक परिस्थिती जेमतेम आसतानाही ज्ञानोबा नादरगे यांनी प्रतीकचे शिक्षण पूर्ण केले परंतु मुंबई येथील नायर रुग्णालयात व मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश झाल्याने पुढील शिक्षणाचा खर्चाचा बोजा झेपेल की नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे समाजातील विविध घटकाने प्रतीकला मदत करण्यासाठी समोर यावे.
0 Comments