ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा


इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा


 ५०० हून अधिक विद्यार्थ्यांची शहरातून भव्य रॅली

​उदगीर: विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण व्हावी, गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव व्हावा तसेच स्पर्धात्मक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळावी या उद्देशाने सिद्धेश्वर पटणे सर यांच्या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला आणि उदगीर शहरातून दिमाखदार गुणगौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या उपक्रमाने शहरातील शैक्षणिक वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.
​या गुणगौरव रॅलीचे उद्घान ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत वैजापूरे आणि गुंडप्पा पटणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. कॅ. कृष्णकांत चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे ही रॅली इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसपर्यंत काढण्यात आली. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये क्लासमधील ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांनी आयसीसी (ICC) पॅटर्नचे आकर्षक व एकसारखे टी-शर्ट परिधान करून रॅलीत सहभागी होवुन शैक्षणिक यशाचा जल्लोष साजरा केला. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्तबद्ध सहभाग आणि एकसमान पोशाखामुळे रॅली अधिक आकर्षक व लक्षवेधी ठरली.
​यानंतर आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत सत्कार सोहळ्यात इयत्ता दहावी व बारावीतील उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास चंद्रकांत वैजापूरे, प्रसिद्ध विधीज्ञ संजय हुले, युवा उद्योजक श्रीकांत पाटील, प्राचार्य सचिन साबणे, प्रा. सोमनाथ बिराजदार, मुख्याध्यापक सुनील रंडाळे, क्लासेसचे मार्गदर्शक गुंडप्पाजी पटणे,मार्गदर्शिका नागीनबाई पटणे, क्लासेसच्या संचालिका संगीता पटणे, श्रीमती सरोजिन सावळे, उपसरपंच नंदकुमार पटणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
​यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना पारंपरिक पद्धतीने फेटा बांधून,शाल व पुषगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर श्री गणेशाची प्रतिमा भेट देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करत पालकांचाही सन्मान करण्यात आल्याने कार्यक्रमाला भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
​कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक गुणवत्तेची चमक दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. विशेषतः शंभर पैकी शंभर गुण संपादन करणाऱ्या विष्णू बालाजी वाघमारे या विद्यार्थ्याचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक करण्यात आले. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत, मजुरी करणाऱ्या कुटुंबातील या विद्यार्थ्याने शंभर टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केल्याने उपस्थितांनी त्याचे विशेष अभिनंदन केले. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळविता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आला.
​यावेळी क्लासमधील ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असल्याने इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. ९५ टक्के पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये विष्णू वाघमारे, दिपक झमकडे, अर्जुन कोतागडे, तेजस्विनी केंद्रे, भक्ती पटणे, दिपीका सिद्धेश्वरे, योगेश मुंडे, आदित्य स्वामी, साक्षी बिराजदार, गायत्री सगर, भगवान केंद्रे, प्राची पाटील, प्रिती वाघमारे, ख़ुशी कमलापुरे , समृद्धी चामवाड, समीक्षा चवळे, अनिकेत केंद्रे,ओमकार जाधव, अफ्रिन शेख, विश्वजीत राठोड, विभावरी चामले, संस्कृती बिरादार इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
​दरम्यान, इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसने गतवर्षीपासून अकरावी-बारावी फाउंडेशन कोर्स व नीट, जेईई, सीईटी व बोर्ड परीक्षेची परिपूर्ण तयारी घेण्यास सुरूवात केलेली असून या कोर्सअंतर्गत राजस्थानातील कोटा येथील अनुभवी प्राध्यापकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असल्याची माहिती पालकांनी यावेळी दिली. या आधुनिक आणि स्पर्धात्मक शैक्षणिक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होत असल्याचे सांगत पालकांनी समाधान व्यक्त केले.
​कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. जीवनात यश संपादन करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, वेळेचे नियोजन, आत्मविश्वास आणि जिद्द आवश्यक असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना विविध प्रेरणादायी उदाहरणांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
​यावेळी बोलताना सिद्धेश्वर पटणे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक यशासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक टिप्स दिल्या. केवळ गुणांसाठी नव्हे तर ज्ञान संपादनासाठी अभ्यास करावा, नियमित अभ्यासाची सवय लावावी, स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टीने लवकर तयारी सुरू करावी आणि आत्मविश्वास कायम ठेवावा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचा समारोप गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवाने, पालकांच्या सन्मानाने आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांनी उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय जामकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.राजकुमार बिरादार यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post