उदगीर शहर व तालुक्यात मटका जोरात ?
उदगीर : शहरात व तालुक्यात मटका नावाचा जुगार मोठ्या प्रमाणात शहरातील विविध चौकात व ग्रामीण घेतला जात असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांत होत आहे. एकीकडे पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशानुसार शहरात विविध ठिकाणी धाडीटाकून अवैध धंद्यावर आळा घालण्याचे काम सुरू आहे मात्र त्यांचेच कर्मचारी अशा अवैध धंद्याकडे दुर्लक्ष केल्याने उदगीर तालुक्यात व शहरात मटका नावाचा जुगार मोठ्या प्रमाणात खेळविला जात असल्याची चर्चा नागरीकातून होत आहे.
यासाठी उदगीर शहरातील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून शहरातील बस स्थानक, नवा मोंढा, जिजामाता भाजी मार्केट, रेल्वे स्टेशन रोड, नाईक चौक, अण्णाभाऊ साठे चौक, संजय नगर,
आदी सह विविध ठिकाणी मटका नावाचा जुगार खेळविला जात असून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तर ग्राणीण भागातील विविध गावातील भर चौकात व पानटप-यावर मटका नावाचा जुगार 'दाम' दुप्पट देवुन 'पोलीसांवरच एकप्रकारे 'वार' करत आहेत. त्या 'मुळे' पोलीसांचेही अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सध्या चौकात ऐकवयास मिळत असुन
याकडे उपविभागीय पोलीस अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उदगीर तालुक्यातील व शहरातील मटका व जुगार त्वरित बंद करण्याची मागणी होत आहे.


Post a Comment