GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लेखक विनय कुकडे यांचा सत्कार

लेखक विनय कुकडे यांचा सत्कार


पुणे : "आम्ही दौंडकर "ग्रूपतर्फे नऱ्हे रोड , नवले पुलाजवळ असलेल्या सिध्दीविनायक अंगण सोसायटी मध्ये संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. दीपा सोनकर यांच्या निवासस्थानी कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंग पाळून लेखक विनय कुकडे यांनी दौंड च्या आठवणी जागविणारे ,ओघवत्या शैलीतील लेख सर्वांना भावले याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अंबादास भोसले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दीपक गटणे होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी बाबू डिसोजा आणि अर्चना साने यांनी केले.
 या कार्यक्रमात सौ. शुभदा साठे, निलीमा शिकारखाने, उमा गटणे, माधुरी डिसोजा, रजनी दिवाणजी, मृणाल अनिखिंडी आदि उपस्थित होते.
सौ. अर्चना साने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments