ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीरचे पत्रकार अधिवेशन ऐतिहासिक होणार : प्राचार्य डॉ. सुधीर जगताप


उदगीरचे पत्रकार अधिवेशन ऐतिहासिक होणार : प्राचार्य डॉ. सुधीर जगताप 

उदगीरच्या मराठी पत्रकार परिषद अधिवेशनानिमित्त आढावा बैठक 

उदगीर : येत्या 18 व 19 एप्रिल रोजी उदगीर येथे होत असलेले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन हे ऐतिहासिक होणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांनी या अधिवेशनासाठीची सर्वतोपरी तयारी सुरु झाली असल्याची माहिती दिली.
उदगीर येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल परिसरात दि. 18 व 19 रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने 44 वे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.  परिषदेचे विभागीय सचिव  मुख्य संयोजक सचिन शिवशेट्टे, उदगीर तालुका मराठी पञकार परिषदेचे  अध्यक्ष युवराज धोतरे , लातूर जिल्हा डिजीटल मिडीया परिषदेचे अध्यक्ष बिभीषन मद्देवाड , सचिव सिद्धार्थ सुर्यवंशी , हल्ला विरोधी कृती समितीचे निमंञक अर्जुन जाधव , स्वागत समितीच्या सदस्या  ज्योती स्वामी ,  विविध समितीचे प्रमुख व्ही. एस. कुलकर्णी, सुनील हवा, रविंद्र हसरगुंडे, विश्वनाथ गायकवाड , हणमंत केंद्रे, नागनाथ गुट्टे, रसूल पठाण,मंगेश सूर्यवंशी , रामदास केदार, संदीप निडवदे , अनिल जाधव, विक्रम हलकीकर, मनोहर लोहारे,  माधव रोडगे, श्रीधर सावळे , यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. सुधीर जगताप यांनी उदगीर शहरात हे पत्रकार अधिवेशन होत आहे, ही गौरवास्पद बाब असल्याचे सांगत अधिवेशनाच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या विविध समितीच्या कामाचा आढावा घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post