उदगीरात मराठी पत्रकार अधिवेशनाच्या सभामंडप कामाचे भूमिपूजन
उदगीर : येत्या दि.१८ व १९ एप्रिल २०२६ रोजी उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
उदगीर येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात हे अधिवेशन पार पडणार आहे. दोन दिवशीय अधिवेशनात अनेक विषयावर परिसंवाद होणार आहेत. महाराष्ट्रभरातून अनेक नामवंत पत्रकार व युवा राजकीय नेते या परिसंवादात सहभागी होणार आहेत. या अधिवेशनासाठी स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात भव्य दिव्य असे सभामंडप उभारण्यात येत आहे.
यावेळी लातूर विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष विजय जोशी, परिषदेचे विभागीय सचिव मुख्य संयोजक सचिन शिवशेट्टे, उदगीर तालुका मराठी पञकार परिषदेचे अध्यक्ष युवराज धोतरे , लातूर जिल्हा डिजीटल मिडीया परिषदेचे अध्यक्ष बिभीषन मद्देवाड , सचिव सिद्धार्थ सुर्यवंशी , हल्ला विरोधी कृती समितीचे निमंञक अर्जुन जाधव , स्वागत समितीच्या सदस्या ज्योती स्वामी , विविध समितीचे प्रमुख व्ही. एस. कुलकर्णी, सुनील हवा, रविंद्र हसरगुंडे, विश्वनाथ गायकवाड , हणमंत केंद्रे, नागनाथ गुटे, रसूल पठाण,मंगेश सूर्यवंशी , रामदास केदार, संदीप निडवदे , अनिल जाधव, विक्रम हलकीकर, मनोहर लोहारे, माधव रोडगे, श्रीधर सावळे , यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. सुधीर जगताप यांनी उदगीर शहरात हे पत्रकार अधिवेशन होत आहे, ही गौरवास्पद बाब असल्याचे सांगत अधिवेशनाच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या विविध समितीच्या कामाचा आढावा घेतला.
**


Post a Comment