ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

पोतणे परिवाराचे स्वप्निल जाधव यांच्याकडून सांत्वन

पोतणे परिवाराचे स्वप्निल अण्णा जाधव यांच्याकडून सांत्वन 

उदगीर  : उदगीर व जळकोट तालुक्यात अतिवृष्टीच्या दरम्यान बालाजी रावसाहेब पोतणे हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे, त्यांचा मृत्यू झाला होता. घरातला कर्ता पुरुष अचानक निघून गेल्याने त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या कुटुंबाला आधार देण्याच्या दृष्टीने तथा सांत्वन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल जाधव यांनी आपल्या हितचिंतकासह पोतने परिवाराची भेट घेऊन धीर दिला. तसेच आपल्या परीने त्या परिवाराला अर्थसहाय्य केले. याप्रसंगी वाढवणा येथील माजी सरपंच शिवकुमार हाळे, माजी सरपंच उत्तम गायकवाड आणि स्वप्निल अण्णा जाधव युवा मंचचे पदाधिकारी यांनी ढोरसांगवी येथे जाऊन पोतणे परिवाराला धीर दिला.
 आपल्या वडिलांनी दिलेली शिकवण सार्थकी करत आपल्या घामाच्या पैशातून उरलेल्या चार पैशाला समाजकार्यासाठी खर्च करावे. या विचाराने सामाजिक बांधिलकी जपुन स्वप्नील जाधव यांनी कार्य चालू ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ढोरसांगवी येथील पोतने परिवाराला मदत करण्याच्या उद्देशाने तथा मानसिक धीर देण्याच्या उद्देशाने युवा मंचचे पदाधिकारी आणि मित्र मंडळांनी भेट देऊन अर्थसहाय्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post