GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी पृथ्वीराज पाटील एकंबेकर तर स्वागताध्यक्ष पदी आ.संजय बनसोडे

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी पृथ्वीराज पाटील एकंबेकर तर स्वागताध्यक्ष पदी आ.संजय बनसोडे

उदगीर : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्यासाठी 2025 च्या सार्वजनिक जयंती महोत्सव समिती बैठकीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
    या बैठकीसाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, संचालक आणि विविध सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या सर्वांच्या उपस्थितीत सर्वानुमते पृथ्वीराज पाटील एकंबेकर यांची सर्वानुमते सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली तर स्वागताध्यक्ष पदी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांची निवड करण्यात आली.
      पृथ्वीराज पाटील एकंबेकर हे एक युवा नेतृत्व असून सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून  त्यांनी गेली अनेक वर्षांपासून आपली कामगिरी बजावली आहे 2024 सार्वजनिक शिवजयंती महत्त्वा समितीचे अध्यक्ष  म्हणून धुरा सांभाळली होती.अशा या युवा नेतृत्वाची पुन्हा एकदा सार्वजनिक शिवजयंतीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज पाटील यांची निवड झाल्याबद्दल माजी नगरसेवक विजयकुमार नुटूरे यांच्या हस्ते त्यांचा शाल, बुके देऊन सर्वांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हिरागीर सिद्धगिर गिरी,  सहसचिव किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रामकिशन मांजरे प्राचार्य शिवाजी महाविद्यालय उदगीर, पृथ्वीराज अशोकराव पाटील , विजयकुमार राजेश्वर नीटुरे माजी नगरसेवक, दिलीप हनुमंते मुख्याध्यापक विद्यावर्धिनी प्राथमिक शाळा उदगीर, सावंन पस्तापुरे माजी नगरसेवक ,राम ढगे मुख्याध्यापक विद्यावर्धनि हायस्कूल ,बिपिन पाटील ,प्रशांत जगताप ,बाळासाहेब पाटोदे ,मदन पाटील ,बाबासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुत्रसंचलन श्री.शिंदे यांनी केले तर आभार राम ढगे यांनी मानले.
 ****************
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव 2025 च्या नियोजित कार्यक्रमाची व विविध देखाव्याचे इत्यंभूत माहिती राजूरकर सर यांनी दिली. नगरपरिषद समोरील मैदान येथे होणाऱ्या  सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती सामाजिक कार्यकर्ते अंकुश ताटपल्ले यांनी दिले.

 ************
माजी नगरसेवक विजय राजेश्वर नीटुरे यांनी शहरात असलेल्या शिवाजी महाविद्यालयाचे नाव एकेरी शब्दात असल्याने एकेरी शब्दात राजाचे नाव घेणे योग्य नाही म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय उदगीर असे नामकरण करावे असे किसान शिक्षण प्रसारक मंडळाला सुचवले व शासन दरबारी जाव लागल्यास मी तयार आसून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पुर्वी नावात बदल झाल्यास मला मनस्वी आनंद होईल असे यावेळी बोलताना म्हणाले.
********************

Post a Comment

0 Comments