GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या मंत्रीपदासाठी दगडुशेठ गणपतीला साकडे

माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या मंत्रीपदासाठी दगडुशेठ गणपतीला साकडे

उदगिरातील युवा उद्योजकांनी केली महाआरती

पुणे : उदगीर मतदार संघाचे भाग्यविधाते विकास पुरुष माजी मंत्री आमदार संजय बनसोडे  महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा कॅबीनेट मंत्री व्हावे म्हणून उदगीर येथील युवा उद्योजकांनी पुण्यातील प्रसिध्द दगडुशेठ गणपती येथे महाआरती करुन साकडे घातले.

उदगीर मतदार संघातून दुसऱ्यांदा ऐतिहासिक मतांनी निवडून आलेले माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदार संघाचा कायापालट करुन उदगीर मतदार संघाची ओळख देशामध्ये निर्माण केली. आमदार संजय बनसोडे यांच्या मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामुळे गेली असून उदगीरच्या विकासाचा रथ असाच पुढे सुरू ठेवण्यासाठी उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी देऊन त्यांचा सन्मान करावा अशी अपेक्षा उदगीरचे रहिवाशी व पुणे येथील युवा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
यावेळी उदगीरचे सुपुत्र पूणे यथील उद्योगपती विनोद कपाळे, साईप्रकाश पारसेवार, बाळासाहेब पाटोदे, कपिल वायचळकर,राजकुमार पाटील,सोमनाथ पाटील, शिवा पाटील, लक्ष्मण तोगरगे, धीरज कसबे, अजित फुलारी, रवी विश्वनाथ, कल्याण कपाळे, सुजित मजगे, रवी हजनाळे, गणेश पटवारी, नरेश बिरादार, सुनील चिमेगावे, अजित अंमगे, सोमनाथ पाटील, महेश पाटील, सतीश बोळेगावे, अभय मुतंगे, अंकूश पसारे, विरभद्र मुतंगे, उमाकांत विरकपाळे, योगेश मुतंगे, अंतेश्वर मुतंगे, अॅड .सुभाष नाळे आदी उद्योजकांनी सुप्रसिध्द दगडूशेठ गणपतीला महाआरती करून गणपती चरणी साकडे घातले. यावेळी दगडूशेट हलवाई गणपती मंदिराचे अध्यक्ष सुनिल रासने यांनीही आ.संजय बनसोडे यांना मंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या  आहेत.

यावेळी पुणे येथील उदगीरचे‌ स्थायिक असलेले असंख्य नागरीक व तरुण उपस्थित होते.
************

Post a Comment

0 Comments