GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती

स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती 

उदगीर : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेजच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक एड्स  दिनानिमित्त उदगीर शहरात जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
  सुरुवातीला स्वामी विवेकानंद स्कूल ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थीनी शासकिय रुग्णालयातून एड्स जनजागृती रॅली काढत विविध पथनाट्य सादर करित एड्स बाबत उपस्थित लोकांना माहिती दिली. त्यानंतर एड्स बाबत मार्गदर्शन पर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सचिन पंडित, तुषार वाघमारे, विश्वनाथ पोटे उपस्थित होते.
  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य ज्योती तारे, प्राचार्य नागसेन तारे,प्रा. प्रिन्सी बी, प्रा. रेखा सूर्यवंशी, प्रा.श्रद्धा सोनकांबळे, प्रा. शिल्पा कवठे, प्रा. अतुल मगर, प्रा. दिपाली ठोके, प्रा. वैष्णवी मारे, बालाजी कदम, नरसिंग जानके,सुरेश पवळे,शकुंतला सोनकांबळे, योगेश काळे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचलन नागसेन तारे यांनी केले.

Post a Comment

0 Comments