राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक तत्वामुळेच बहुजन उपेक्षित समाजाचा विकास : सतिश उस्तुरे
उदगीर : शिक्षणानानेच बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास या तत्वामुळे दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळला तसेच समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी अमलात आणली. शाहु महाराजांनीसंपूर्ण जीवन बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले असे प्रतिपादन मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश उस्तुरे यांनी केले.
ते मातृभूमीत छञपती शाहूमहाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा बिभीषण मद्देवाड, प्रा. उस्ताद सय्यद, प्रा. रेखा रणक्षेञे ,आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना उस्तुरे म्हणाले,
छञपती शाहू महाराजांनी दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे आदेश देत जातिभेद नष्ट केला.अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.
यावेळी मातृभूमी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कस्तुराबाई नर्सिंग स्कूल मातृभूमी नर्सिंग स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विशेष डॉ. रामचंद्र भांगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दामिनी धनवे यांनी केले आभार दिपाली डावळे यांनी मानले.
0 Comments