GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

निरोगी शरीरात निरोगी मनासाठी योग महत्त्वाचे : योग प्रशिक्षक प्राचार्य उषा कुलकर्णी

निरोगी शरीरात निरोगी मनासाठी योग महत्त्वाचे : योग प्रशिक्षक प्राचार्य उषा
 कुलकर्णी 

उदगीर : शरीर व मन,प्रसन्न चिंतामुक्त व निरोगी मानसिक सुदृढते सोबतच निर्णय क्षमता तसेच शरीर मन भावना जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा व  शरीराची प्रतिकारशक्ती , शरीरिक ऊर्जा  वाढविण्यासाठी निरोगी शरीरात निरोगी मन राहण्यासाठी योग महत्वाचे असल्याचे प्रतिपादन योग प्रशिक्षक प्राचार्य उषा कुलकर्णी यांनी केले 
.
त्या मातृभूमी महाविद्यालयात दहाव्या जागतिक योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
 यावेळी मातृभूमी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. बिभिषण मद्देवाड, प्रा. रणजीत मोरे, प्रा. रेखा रणक्षेत्रे, संतोष जोशी, यांची उपस्थिती होती. 
यावेळी योग शिक्षक व मातृभूमी प्रतिष्ठानच्या सचिव उषा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. यावेळी मातृभूमी महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कस्तुराबाई नर्सिंग स्कूल आणि मातृभूमी नर्सिंग स्कूल चे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले  होते.

Post a Comment

0 Comments