लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा : युवा नेते चंदन पाटील नागराळकर
उद्या उदगीर शहरात काँगेस नेत्या प्रियंका गांधींची सभा
उदगीर : लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस नेत्या प्रियंका गांधी यांची उद्या शनिवार दि. २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता उदगीर येथे सभा आयोजीत करण्यात आली आहे तरी या सभेस सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व नेते उपस्थित राहणार असुन लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे युवक नेते चंदन पाटील नागराळकर यांनी केले आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या सभांना देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळत असुन उदगीर तालुका हा मागील काळात काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. उदगीर तालुक्यातील जनतेवर मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाच्या विचाराचा पगडा असल्यामुळे उदगीर शहरात उद्या काँग्रेस पक्षाच्या देशाच्या नेत्या प्रियंका गांधी यांची लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेची जय्यत तयारी सुरु असून संपूर्ण मतदार संघातून मोठ्या प्रमाणात नागरिक या सभेला उपस्थित राहणार आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघातील युवक, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजकासह सर्व समाज घटक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन चंदन पाटील नागराळकर व इतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व नेत्यांनी केले आहे.
0 Comments