GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

सक्षम नेतृत्वासाठी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे

सक्षम नेतृत्वासाठी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे
महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकार आग्रही

उदगीर : लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करा आपल मत हे मौल्यवान आहे.
श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाला एकच मताचा अधिकार ही विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची किमया आहे. लातूर लोकसभा मतदार संघामध्ये मागासर्वीय बांधवांची  संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हा मतदार संघ राखीव आहे. विरोधक मात्र या महायुतीवर संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार करत आहेत. त्यांच्या भुलथापांना  बळी न पडता सक्षम नेतृत्वासाठी तिस-यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा असे प्रतिपादन महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.

ते भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आ.गोविंदराव केंद्रे, माजी आ.सुधाकर भालेराव, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, जयश्री पाटील, उत्तारा कलबुर्गे,  शिवानंद हैबतपुरे, डाॅ.अनिल कांबळे, प्रा.श्याम डावळे, शिवशंकर धुप्पे, मनोज पुदाले, बालाजी भोसले, वसंत पाटील,  सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, अॅड.दिपाली औटे, सुप्रिया पायाळ, रविप्रभा खादीवाले, रेखा हाके, उषा रोडगे, गणेश गायकवाड, शामला कारामुंगे, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकार आग्रही असुन मागील अनेक पिढ्यापासुन आपली माय माऊली ही चुलीवर स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करत असताना धुर डोळ्यात गेल्यामुळे दृष्टीदोष व्हायचा. तिचा हा त्रास कमी करण्यासाठी मोदी सरकारने
' उज्वला गॅसची' योजना आणली व महिलांचे जीवन सुखमय केले.  या योजनेचा लाभ कोट्यावधी महिलांनी घेतला.
उन्हात तान्हात जावून डोक्यावर घागर घेवुन लांबवरुन पाणी आणावे लागत होते यात अनेक महिलांना त्रास होत होता तो त्रास लक्षात घेवुन केंद्र व राज्य शासनाने
'जलजीवन मिशन'  ही योजना आणली व या योजनेअंतर्गंत प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर प्रमाणे शुध्द व स्वच्छ पाणी घराघरात पोहचविले.

आपल्या घरात मुलगी जन्माला आली तर तिच्या उज्वल भविष्यासाठी ' सुकन्या योजना' , महिलांसाठी ३३ % आरक्षणाचा निर्णय शासनाने घेतला, बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी सरकराचे प्रयत्न असुन येत्या काळात महिला ह्या आपल्या स्वत:च्या पायावर उभ राहून छोटा मोठा व्यावसाय करु शकतील.
महाराष्ट्रात महिलांना बस प्रवासात 50% सवलत देवून  त्यांचा सन्मान केला. रेल्वेला फक्त पुरूषच लोकोपायलट म्हणून होते. मात्र मोदी सरकारच्या नव्या धोरणानुसार रेल्वे व मेट्रो चालवायला महिलांना प्राधान्य दिल्याने आता पुरुषा बरोबर महिलाही रेल्वे चालवू लागल्या.
महिलांचा सन्मान राखण्यासाठी ' हर घर शौचालय' यानुसार प्रत्येक कुटुंबात
शौचालयाची योजना मंजुर करुन ते बांधून दिले व स्वच्छतेचे महत्व सांगितले अशा किती तरी योजना शासनस्तरावरुन आपल्या दारापर्यंत आल्या आहेत त्यामुळे लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनाच  विजयी करा असे आवाहनही ना.बनसोडे यांनी केले.
या महिला मेळाव्याला हजारो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments