GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृती अभियान

प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृती अभियान

उदगीर : तालुक्यातील कोदळी-मांजरी-देवुळवाडी परिसरातील गावांमध्ये प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी सुशांतजी शिंदे यांच्या संकल्पनेतून तहसीलदार राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती कार्यक्रम उदगीर तालुक्यात राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नळगीर मंडळ अंतर्गत कोदळी सज्जातील मांजरी- कोदळी- देऊळवाडी या गावात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
 यावेळी मंडळ अधिकारी संतोष चव्हाण, कोदळी सज्जाचे तलाठी करेप्पा, मांजरीच्या ग्रामसेविका जाधव , कोदळीचे ग्रामसेवक कवडे , देऊळवाडीचे ग्रामसेवक उडते यांनी गावांमध्ये जाऊन मतदानाचे महत्त्व पटवून देऊन येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. यावेळी प्रत्येक गावातील सरपंच,उपसरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments