GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

टपाल कार्यालयाचे बांधकाम होणार : खासदार सुधाकर श्रृंगारे

टपाल कार्यालयाचे बांधकाम होणार : खासदार सुधाकर श्रृंगारे

नूतनीकरणास ३८ कोटींचा निधी मंजूर


उदगीर : गेल्या अनेक वर्षापासून उदगीर शहरातील टपाल कार्यालयाच्या इमारतीची दुरावस्था झाली होती. पावसाळ्यामध्ये इमारत गळत असल्याने व इमारत पडण्याची भिती निर्माण झाल्याने या कार्यालयाचे कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत होते. दरम्यान, कार्यालयाच्या नूतनीकरणास ३८ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी दिली आहे.

येथील टपाल कार्यालयाच्या नूतनीकरण व बांधकाम करण्यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्याकडे पाठपुरावा करत ३७.५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असल्याची माहिती दिली आहे. 
या भागातील नागरिकांनी लातूरचे खासदार शृंगारे यांच्याकडे वारंवार मागणी केल्याने त्यांनी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्र्यांची भेट घेऊन तत्काळ या इमारतीला
निधी देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला अनुसरून केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केंद्र शासनाच्या वतीने या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ३७.५५ लाख रुपयाचा निधी मंजूर करून तो वितरितही केला आहे. वर्ष १९७६ मध्ये बांधलेल्या या जुन्या पोस्ट ऑफिसच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली होती.

पावसाळ्यामध्ये इमारत गळत असल्याने व पडण्याची भीती निर्माण झाल्याने या कार्यालयाचे कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत होते. येथे टपाल कार्यालयाचे बांधकाम करण्याबाबत नागरिकांकडूनही मागणी सुरू होती. आता नूतनीकरणासाठी मान्यता मिळाली असून नुकतेच त्या बाबतचे आदेश प्राप्त झाले. ३७.५८ लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे टपाल कार्यालयाच्या अद्ययावत इमारतीचे बांधकाम व नूतनीकरण आता होणार असुन नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

Post a Comment

0 Comments