GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

किल्ला जतन व दुरुस्तीसाठी ३ कोटी ७७ लक्ष रुपयाचा निधी मंजूर : क्रीडा मंत्री संजय बनसोडे

किल्ला जतन व दुरुस्तीसाठी ३ कोटी ७७ लक्ष रुपयाचा निधी मंजूर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त " एकछत्र योजनेअंतर्गंत " निधी उपलब्ध

 क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

उदगीर : महाराष्ट्र, आंध्रा व कर्नाटक या
तीन राज्याच्या सिमेवर असलेल्या उदगीर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची जतन व दुरुस्ती व्हावी म्हणून पुरातत्व विभागाकडे सतत पाठपुरावा करुन किल्ला दुरूस्तीसाठी मागील काळात निधी मंजूर करुन घेतला होता. त्यातील पहिल्या टप्प्यातील काम पुर्ण झाले असुन आता दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यासाठी शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातुन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ' एकछत्र योजनेअंतर्गंत '  ३ कोटी ७७ लक्ष ५ हजार ७५२ रुपयाचा निधी मंजूर करुन घेतल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
या भुईकोट किल्ल्याच्या बहुतांश भागाची पडझड झाली असल्याने त्या परिसराचे जतन व दुरूस्ती करण्याचे काम सद्या चालु आहे. तीन राज्याच्या सीमेवर असणाऱ्या शहरातील भुईकोट किल्याच्या पहिल्या टप्प्यातील दुरूस्तीचे काम झाले असुन उदगीर येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या जतन व दुरूस्तीच्या कामाचा पुढील टप्यास मान्यता द्यावी म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या भागाचे आमदार व राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी लेखी मागणी केली होती. याबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी किल्ला दुरुस्तीसाठी वाढीव निधी ३ कोटी ७७ लक्ष रुपये मंजूर केले आहेत.

या भुईकोट किल्ल्यामध्ये असलेल्या उदागिर बाबांच्या दर्शनासाठी परिसरासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात. तर महिन्यातील प्रत्येक सोमवारी उदागिर बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग येथे लागत असते.
दरवर्षी गुढी पाडव्याला येथे मोठी यात्रा भरते यावेळी लाखो भाविकांची येथे मोठी गर्दी असते अशा या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची दुरूस्ती व्हावी म्हणून आपण विशेष प्रयत्न करुन शासनाकडुन निधी उपलब्ध करुन घेतला असुन सदर किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाला आता वेग येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे तथा परभणीचे पालकमंत्री 
संजय बनसोडे यांनी सांगितले.
भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या भुईकोट किल्ल्यासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत. तर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी किल्लासाठी ना.संजय बनसोडे यांनी निधी उपलब्ध करुन घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment

0 Comments