भारतीय विद्यार्थांना गुणवत्तेच्या जोरावर परदेशात रोजगाराच्या अनेक संधी - पंडित आम्ब्रे (सेल्स मॅनेजर,विनमेट तैवान)
उदगीर : विशिष्ट कौशल्य प्राप्त केलेल्या आणि एखाद्या विषयात आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना भरपूर पगारावर जगभरात मोठी मागणी आहे.असे गुणवंत विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन जगभरातून परकीय चलन आपल्या देशाला पाठवून आपल्या बुद्धी कौशल्यावर आपल्या देशाचे नाव जगात उंचावत आहेत व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकारे देशाच्या विकासामध्ये आपले योगदान देत आहेत. असे गुणवंत जगभरातील महत्त्वाच्या संस्थेवर महत्त्वाच्या पदावर विराजमान असलेले आपण पाहतोय. गुणवंतांना देशाबाहेर विविध क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास करून मोठे व्हावे व आपल्या देशासोबत मानवी जिवनाच्या कल्याणासाठी प्रयत्न करावेत असे मत वीनमेट लिमिटेड कंपनी तैवानचे सेल्स मॅनेजर पंडित आम्ब्रे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील अग्रगण्य शैक्षणिक चळवळ उदयगिरी अकॅडमी येथे झालेल्या त्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. सत्कार समारंभ अध्यक्षस्थानी उदयगिरी अकॅडमीचे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत गायकवाड,
गणपत भोसले,उदयगिरी अकॅडमीचे संचालक मार्गदर्शक प्रा. संतोष पाटील, प्रा.डॉ.धनंजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयगिरी अकॅडमीचे मार्गदर्शक प्रा. ज्योती खिंडे, प्रा.श्रीगण वंगवाड, प्रा. मीनाताई हुरदळे, प्रा. नंदिनी नीटूरे , प्रा.निवेदिता भंडारे, श्री.मारावार मामा यांच्यासह उदयगिरी अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments