GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

उदगीर : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व सस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.
    25 जानेवारी हा दिवस भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस म्हणुन संपूर्ण देशभर साजरा करण्यात येतो. त्याचेच औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले तसेच विद्यार्थ्यांची लोकशाहीवर निष्ठा कायम ठेवण्यासंबंधी शपथ घेण्याचा कार्यक्रम देखील घेण्यात आला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.धनंजय गोंड यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मतदारासाठीची प्रतिज्ञा दिली.
  यावेळी परीक्षा विभागाचे प्रमुख डॉ. शेषनारायण जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे,पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे,  प्रा.रशीद दायमी, प्रा. हनुमंत सुर्यवंशी, प्रा. अशिफ दायमी, प्रा.संजीवनी भालेराव, प्रा.सोनल सोनफुले,प्रा.ऋतुजा डिग्रसकर, प्रा.त्वरिता मिटकरी, प्रा.आकाश कांबळे, प्रा. राखी शिंदे, प्रा.आवेज शेख, प्रा.अनुजा चव्हाण, प्रा.नावेद मणियार उषा गायकवाड, कुशाबाई, अमोल भाटकुळे, अपर्णा काळे यांच्या सह विद्यार्थी मोठया संख्येनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments