GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

जय हिंद पब्लिक स्कूल ला क्रीडा उपसंचालक यांची भेट

जय हिंद पब्लिक स्कूल ला क्रीडा उपसंचालक यांची भेट 

उदगीर : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे येथील उपसंचालक  युवराज नाईक यांनी सदिच्छा भेट दिली.उपसंचालक युवराज नाईक यांनी या भेटी दरम्यान उदगीर येथे जय हिंद पब्लिक स्कूल मध्ये होणाऱ्या राज्य स्तरीय शालेय मलंखाब स्पर्धाच्या आयोजन व नियोजन संदर्भात चर्चा केली. तसेच उदगीर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय युवा महोत्सव संदर्भात ही चर्चा केली. 
     यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डाॅ.सुधीर जगताप,लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड,  जय हिंद पब्लिक स्कूलचे प्राचार्य संजय हट्टे, प्राचार्य मनोरमा शास्त्री, सांस्कृतिक विभाग प्रमुख सतीश वाघमारे, क्रिडा शिक्षक व राष्ट्रीय पंच संदीप पवार, अशोक परीट, धोतरे, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments