GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लालबाहदुर विद्यालयात गीता जयंतीनिमित्त सामूहिक गीता पठणाचे आयोजन

लालबाहदुर विद्यालयात गीता जयंतीनिमित्त सामूहिक गीता पठणाचे आयोजन

 उदगीर : येथील लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात गीता जयंतीनिमित्त सामूहिक गीता पठणाचे आयोजन करण्यात आले होते.मोक्षदा एकादशी दिनी गीता जयंतीनिमित्त दोन हजार विद्यार्थ्यांनी गीतेतील पंधराव्या अध्यायाचे अतिशय शिस्तीत पठण केले. 
    या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक कृष्णा मारावार उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. उद्धव महाराज हैबतपूरे, विश्व हिंदू परिषदेचे व शालेय समिती सदस्य संतोष कुलकर्णी ,राष्ट्रसेविका समितीच्या निर्मलाताई देशपांडे ,मुख्याध्यापक अंबादास गायकवाड इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
   प्रारंभी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकामधून अंबिका पारसेवार यांनी गीता जयंती व गीतेचे जीवनात असलेले महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर संस्कृत शिक्षक किरण नेमट यांच्या नेतृत्वाखाली गीतेचा पंधरावा अध्याय दोन हजार विद्यार्थ्यांनी मुखोदगत पठण केला. अध्यक्षीय समारोपात कृष्णा मारावार यांनी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात आपण काम करत असताना गीता आपल्याला मार्गदर्शक ठरते. गीतेच्या पठणाने वाणी व बुद्धी स्वच्छ होतेतसेच संकटाच्या काळात गीताच आपल्याला आधार देत असते, असे प्रतिपादन केले .
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम प्रमुख प्रीती शेंडे, स्वागत व परिचय अभ्यास पूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार छाया दिक्कतवार यांनी मानले .कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments