GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात एक तारीख एक तास एक साथ अभियान

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात एक तारीख एक तास एक साथ अभियान 

उदगीर : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून सस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देशात "एक तारीख एक तास एक साथ" याप्रमाणे राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
    प्रारंभी सकाळी 10:00 वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या उपस्थितीत स्वच्छ्ता अभिनयाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक डॉ. धनंजय गोंड, परीक्षा विभागाचे प्रमुख डॉ.शेषनारायण जाधव,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       सदरील अभियानात उपस्थित सर्व शिक्षक व स्वंयसेवक यांना मार्गदर्शन करतांना डॉ. सुधीर जगताप म्हणाले की, म. गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपुर्ण देशात आज एक तारीख एक तास श्रमदान करून राष्ट्रीय स्वच्छ्ता अभियान राबविण्यात येत आहे. यात आपल्या परिसरातील, महाविद्यालयातील, नदी-नाले, रस्ते, नगरातील स्वइच्छेने स्वच्छ्ता करणे गरजेचे आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत हे अभियान सुरू केले. त्यानुसार संपुर्ण देशात विविध योजनांच्या माध्यमातून शहरी - ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबविण्यात येते. यावेळेस म. गांधी यांना श्रध्दांजली म्हणून संपुर्ण देशात एकाच वेळी एक तास स्वच्छता करण्याचे आवाहन पंतप्रधान यांनी केले आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आपल्या कॅम्पस मध्ये स्वच्छता करीत आहोत असे ही ते म्हणाले.
     यावेळी प्रा. आकाश कांबळे, प्रा. हनुमंत सूर्यवंशी, प्रा. असिफ दायमी, प्रा. ऋतुजा दिग्रसकर, प्रा. अनुजा चव्हाण, प्रा. राखी शिंदे, प्रा. त्वरिता मितकरी, यांच्या सह स्वयंसेवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments