GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या लातूर जिल्हा कार्याध्यक्षपदी सौ.दिपाली अभिजीत औटे यांची निवड

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या लातूर जिल्हा कार्याध्यक्षपदी सौ.दिपाली अभिजीत औटे यांची निवड 


मुंबई : येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात काल दि.२३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उदगीर शहर अध्यक्षा अँड दीपाली अभिजीत औटे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या लातूर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे व राकाँपाचे लातूर जिल्हाध्यक्ष आ. बाबासाहेब पाटील यांच्या शिफारसी नुसार करण्यात आली . 
सदर निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बदरे मंत्री संजयजी बनसोडे यांनी दिपाली औटे यांचा मंत्रालयात सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 या वेळी जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस कला चित्रपट साहित्य व सांस्कृतिक विभागाचे उदगीर शहर अध्यक्ष अभिजीत औटे, राकाँपा सामाजिक न्याय विभागाचे उदगीर तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोधंळे , महेंद्रकुमार आचार्य आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments