GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर येथे लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपचे आयोजन

उदगीर येथे लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपचे आयोजन

आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन; लातूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय निटुरे यांची माहिती

उदगीर : तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या उदगीर शहरात दि.१९ मे पासून उदगीर येथे लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप चे आयोजन करण्यात आले असुन या क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती लातुर लोकसभा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सारख्या खेळामध्ये सहभागी होता यावे यासाठी या स्पर्धा घेण्यात येत असुन तालुकास्तरावर प्रथम पारितोषिक 51 हजार तर द्वितीय पारितोषिक 31 हजार तर जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये द्वितीय 51 हजार रुपये तृतीय 31 हजार रुपये अशी  पारितोषिके ठेवण्यात आले असून या स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर प्रथम येणारे  संघ  जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरतील. उदगीर येथे दि.१९ ते २५ मे दरम्यान या स्पर्धा जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजीत करण्यात आल्याची माहिती युवकचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विजय निटुरे यांनी दिली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त क्रिकेट प्रेमी खेळाडुंनी सहभागी होण्याचे आवाहन निटुरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments