महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप
उदगीर : तालुक्यातील पिंपरी येथे दि.१४ एप्रिल रोजी महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.
यावेळी प्रल्हाद यशवंत गायकवाड यांनी आपल्या वडिलांच्या स्मरनार्थ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली . याच प्रतिमेचे पूजन करून आनंदाचा सिधा वाटप करण्यात आला. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन व सदस्य, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्यासह गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व राशन कार्ड धारक उपस्थित होते.
0 Comments