GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

"रंगकर्मी" च्या वतीने खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन; 40000 ची रोख पारितोषिके व आकर्षक ट्रॉफी

"रंगकर्मी" च्या वतीने  खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन; 40000 ची रोख पारितोषिके व आकर्षक ट्रॉफी 

उदगीर : येथील रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दि. 28 मे 2023 रोजी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन श्री हावगीस्वामी महाविद्यालय बॅडमिंटन स्टेडियम, समता नगर, उदगीर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत 
या स्पर्धेसाठी (प्रथम -खुला गट दुहेरी) प्रथम पारितोषिक 7000 आकाश मंठाळकर,द्वितीय पारितोषिक 5000 माधवशेठ नागरगोजे,  तृतीय पारितोषिक 3001अॅड.शिवाजी राठोड ,{ द्वितीय -35 वर्षावरील दुहेरी गट} प्रथम पारितोषिक 7000 डॉ,नागनाथ कवडगावे  द्वितीय 5 000 रमेश हणमंते  तृतीय 3000 संदीप कोयले  (तृतीय -खुलागट एकेरी) प्रथम पारितोषिक 5000 बाळासाहेब पाटोदे द्वितीय 3000 प्रवीण भोसले तृतीय 2000 नरहरी नागरगोजे यांच्या वतीने दिले जाणार आहे .तसेच या स्पर्धेत बेस्ट शूटर ,बेस्ट डिफेन्स, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज यासाठी आकर्षक ट्रॉफी ठेवण्यात आले असून स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.सर्व सामने युट्यूब लाईव्ह करण्यात येणार असून या स्पर्धेसाठी सर्व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाचे नियम लागू राहणार असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिनांक 27 मे 2023 पर्यंत स्पर्धकांनी स्पर्धेसाठी नाव नोंदणी आयोजक मारोती भोसले 9422 267773 या यांच्याकडे करण्याचे  आवाहन रंगकर्मी साहित्य,कला,क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड,सचिव ज्योती मद्देवाड, सिद्घार्थ सुर्यवंशी,अॅड विष्णू लांडगे ,अॅड महेश मळगे ,रसुल दा पठान,  रामदास केदार,लक्ष्मण बेंबडे,महादेव खळूरे ,  संदीप मद्दे, सचीन शिवशेट्टे, प्रल्हाद येवरीकर,जहाँगीर पटेल,निता मोरे,ज्ञानेश्वर बडगे ,विवेक होळसंबरे,  टी.डी. पांचाळ,बालाजी भोसले,अर्चना पाटील,मोहसिन शेख,  नारायण कुंडले,मारोती वाघमारे ,गजानन देवकत्ते,हणमंत केंद्रे,नागनाथ गुट्टे यांनी केले आहे.

चौकट..
"उदगीर नगरी तशी ऐतिहासिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात सुद्धा उल्लेखनीय कामगिरी करणारे भूमी असून त्याचाच वारसा जपत रंगकर्मी संस्थेच्या वतीने ग्रामीण तसेच शहरी बॅडमिंटन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवा
 मारोती भोसले
 संयोजक,बडमिंटन  स्पर्धा

Post a Comment

0 Comments