तात्काळ एम आय डी सीचा प्रश्न मार्गी लावावा
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांची मागणी
उदगीर : शहर व तालुक्यातील तरुणांची संख्या लक्षणीय असून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी उदगीर मतदार संघात शासकीय एमआयडीसी आपण मंजूर केली आहे त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन या भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी गेल्या तीन वर्षापासून मी आग्रही मागणी करत आहे या मागणीचा विचार करून मागील सरकारने उदगीर परिसरात ३०८ हेक्टरवर एमआयडीसी मंजूर केली मात्र प्रत्यक्षात त्याचे काम चालू झाले नसल्याने या भागातील रोजगाराचा प्रश्न जशास तसा राहिला आहे मागील काळात बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा म्हणून आपण रोजगार मेळावा घेतला यामध्ये जवळपास 500 तरुण विविध ठिकाणी कामासाठी गेले आपल्या मतदारसंघातील युवक हा बाहेरगावी जाऊन काम करतो याची खंत वाटल्याने येथेच रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून उदगीर तालुक्यातील चांदेगाव परिसरात शासकीय एमआयडी सी मंजुर केली आहे मात्र काही कारणास्तव याचे काम संथ गतीने चालु असुन ती तात्काळ एम आय डी सीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांची येथे भेट घेवुन केली.
उदगीर - जळकोट मतदार संघात तरुणांची संख्या जास्त असल्याने या भागात रोजगाराची संधी उपलब्ध झाली तर याच परिसरातील तरुणांना आपल्या तालुक्यातच रोजगार उपलब्ध होईल जेणेकरून मतदार संघातील बेरोजगारी कमी होऊन या भागातील नागरिकांचे आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार असून यासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून याबाबत पाठपुरावा करत असल्याचे आ.बनसोडे यांनी बोलताना सांगितले.
0 Comments